www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लहान मुलांना बँकेत खातं उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी खातं उघडण्याचा श्रीगणेशा केला आहे.
स्टेट बँकेच्या चेअरपर्सन अरूंधती भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं, आम्ही मुलांसाठी बचत खाते उघडले आहेत. पण या खात्यांवर ओव्हर ड्रॉप घेण्यास मनाई आहे. पण यात ओव्हरड्रॉप होत असेल, तर आम्ही याची वसुली करू शकणार नाहीत.
मात्र जमा होणाऱ्या रकमेवर कोणताही प्रतिबंध नाही, पुढील तीन महिन्यांसाठी लहान मुलांसाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकने मंगळवारी 10 वर्षाच्या वरील मुलांना स्वतंत्रपणे बँक खातं उघडण्याची परवानगी दिलीय, तसेच या बाबतीत नियम निश्चित केले आहेत. स्वतंत्रपणे खात्याची हाताळणी तसेच एटीएम आणि चेक बुक सुविधेचीही परवानगी दिली आहे.
आर्थिक समावेश वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. बँकेत या प्रकारचं खातं उघडून एकरूप आणण्याचा प्रयत्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.