पाचवीतील २ विद्यार्थींनींचे वसतिगृहात जबरदस्तीने उतरविले कपडे

छत्तीसगडमधील जाशपूर जिल्हयात एका सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात पाचवीतील २ विद्यार्थींनींचे जबरदस्तीने कपडे उतरविण्यात आले. त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या त्यांच्या फ्रेंडला त्यांच्यासह मारहाण करण्यात आली. यातील एकाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत याचे वाईट परिणाम होतील, असे धमकावले.

Updated: Aug 26, 2015, 03:20 PM IST
पाचवीतील २ विद्यार्थींनींचे वसतिगृहात जबरदस्तीने उतरविले कपडे  title=

रायपूर : छत्तीसगडमधील जाशपूर जिल्हयात एका सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात पाचवीतील २ विद्यार्थींनींचे जबरदस्तीने कपडे उतरविण्यात आले. त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या त्यांच्या फ्रेंडला त्यांच्यासह मारहाण करण्यात आली. यातील एकाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत याचे वाईट परिणाम होतील, असे धमकावले.

वसतिगृह अधिक्षक सुमित्रा चौहान यांच्या एका नातेवाईक पिंटू चौहान याने पाचवीतील दोन मुलींचे कथित प्रकारे जबरदस्तीने कपडे काढले. यावेळी त्यांच्या एका फ्रेंडने विरोध केला. त्यावेळी त्यालाही त्यांने मारहाण करत तिची छेडछाड केली. मुलींच्यावतीने कारवाई करण्याची मागणी करताना तक्रार केली. यावेळी त्याच्यावर कारवाई न केल्याने मुलींनी वसतिगृह सोडले.

याबाबतची माहिती त्यांनी आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर सोमवारी मारहाण आणि छेडछाड करणाऱ्याचा राजीनामा मागत कुटुंबीयांनी शाळेला घेराव घातला. दरम्यान, आंदोलन करणाऱ्यांचा आरोप आहे की, वसतिगृह अधिक्षक आपल्या पतीसह राहत आहे. हे बेकायदेशीर आहे. याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन शाळा प्रशासनाने दिलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.