नवी दिल्ली : राजस्थानमध्ये ४ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानशी सलग्न एकूण 1037 किलोमीटरच्या सीमा भागात मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. बीएसएफ आंतरराष्ट्रीय सीमा भागांवर कडक लक्ष ठेवून आहेत. सीमा भागातील गावांमध्ये ही कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव पाहता सध्या मोठी सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाला सीमा भागांवर कडक लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. सीमाभागातून घुसखोरी किंवा गोळीबार होऊ शकतो त्यामुळे त्यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी सीमाभागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजस्थानच्या चार जिल्ह्यांचा 1033 किलोमीटरचा सीमाभागाग पाकिस्तानला लागून आहे. 433 किलोमीटरची सीमा जैसलमेरला लागून आहे. या सीमाभागांवर बीएसएफच्या 300 बोर्डर आउट पोस्ट आहेत जेथे 35 ते 40 हजार जवान दिवस रात्र लक्ष ठेवून असतात. अंतरराष्ट्रीय सीमेवर 3-4 किलोमीटरअंतर्गत सुरक्षेची जबाबदारी बॉर्डर आउट पोस्टवर आहे. येथे जवळपास 25 हून अधिक ऑपरेशनल बटालियन तैनात आहे. घुसखोरी, तस्करी आणि ISIच्या हालचाली पाहता ही सीमा संवेदनशील असल्याने ती पूर्णपणे सीज केली गेली आहे. पाकिस्तानने जैसलमेरमध्ये अचानक युद्सभ्यास सुरु केला आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात या सीमाभागात बीएसएफचे जवान तैनात केले गेले आहेत. उरी आणि सर्जिकल स्ट्राइकशी जवान देखील परिचित आहे. जवानांना देखील असं वाटतंय की, पाकिस्तानकडून काहीतरी हरकत होऊ शकते.