लाईटहाऊसवरच्या 'सेल्फी'नं घेतला तिचा बळी!

सेल्फीच्या नादापायी आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. याच वेडाला जोधपूरची एक तरुणी बळी पडलीय.

Updated: Jun 2, 2016, 09:43 PM IST
लाईटहाऊसवरच्या 'सेल्फी'नं घेतला तिचा बळी! title=

कर्नाटक : सेल्फीच्या नादापायी आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. याच वेडाला जोधपूरची एक तरुणी बळी पडलीय.

आपल्या चार मित्रांसोबत फिरण्यासाठी मुंबई-गोवा आणि नंतर कर्नाटकचा दौरा करायला गेलेली २२ वर्षीय तरुणी प्रणिता मेहता हिनं सेल्फीच्या नादापायी आपला जीव गमावलाय. 

गोकर्णाच्या समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी प्रणिता लाईटहाऊसवर चढली. यावेळी सेल्फी काढता काढता प्रणिताचा तोल गेला आणि ती जवळपास ३०० फूट उंचावरून समुद्राच्या पाण्यात पडली.

समुद्र किनाऱ्यावर उपस्थित असणाऱ्या काही स्थानिक मच्छिमारांनी होडी घेऊन तिच्या शोधासाठी प्रयत्न केला... परंतु, एव्हाना उशीर झाला होता. 

जोधपूरमध्ये राहणारे प्रणिताचे आईवडील डॉक्टर आहेत. त्यांना आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर जबरदस्त धक्का बसलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, तीन महिन्यांपूर्वीच मेहरानगढ किल्ल्यावरून सेल्फी काढता काढता एका तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला होता.