www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलीय. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली.
या वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वेतनापेक्षा जास्त वेतन मिळेल. केंद्र सरकारनं ही घोषणा आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन केली असल्याचं बोललं जातंय. याचा फायदा ८० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल.
सरकारनं आज सातव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली. हा वेतन आयोग २ वर्षात आपल्या शिफारशी लागू करतील. कामगार संघटनांची मागणी लक्षात घेऊन यावेळी सरकारनं वेळेआधीच सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली.
सरकारनं सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २००६पासून लागू झाल्या होत्या. तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६पासून लागू होणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.