चंदीगड : पंजाब पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास डेराबस्सी भागात, देह व्यापार प्रकरणी तीन युवतींसह चार लोकांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे.
याची माहिती देताना पोलिस अधिकारी त्रिलोचनसिंग म्हणाले, की पंजाब नॅशनल बॅंकेजवळ एक अल्टो कार संशयास्पदरीत्या थांबली होती. यात तीन युवती आणि एक युवक होता.
एका पोलिसाला बनावट ग्राहक करुन कारमधल्या लोकांशी बोलायला पाठवले. यावेळी कारमध्ये बसलेल्या युवकाने एका युवतीसाठी दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर भाव करण्यात आला.
अखेर ८ हजार रुपयांवर सौदा पक्का झाला. त्यानंतर वेष बदलून गेलेल्या पोलिसाने अॅडव्हान्स म्हणून २ हजार रुपये दिले. यावेळी त्याने इतर पोलिसांना येण्याचा इशारा केला. लगेच पोलिस टीम तेथे दाखल झाली. त्यानंतर कारमधील चौघांना अटक करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.