अवघ्या ४८ तासांत 'पॅनकार्ड' तुमच्या हातात...

पॅनकार्ड बनवून घेण्याची किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी पॅनकार्ड हातात पडतो, हा अनुभव तुम्हालाही आलाच असेल... मात्र, आता नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड बनवून मिळण्याची सोय उपलब्ध झालीय. 

Updated: Apr 22, 2015, 04:50 PM IST
अवघ्या ४८ तासांत 'पॅनकार्ड' तुमच्या हातात... title=

नवी दिल्ली : पॅनकार्ड बनवून घेण्याची किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी पॅनकार्ड हातात पडतो, हा अनुभव तुम्हालाही आलाच असेल... मात्र, आता नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड बनवून मिळण्याची सोय उपलब्ध झालीय. 

केंद्र सरकार लवकरच अशी व्यवस्था सुरू करणार आहे, ज्याद्वारे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड तुमच्या घरी पोहचणार आहे. याआधी 'सीबीडीटी'नं जाहीर केल्यानुसार, कोणतीही व्यक्ती केवळ मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्डद्वारे पॅनकार्ड बनवू शकतात. त्यानंतर, पॅनकार्डचं महत्त्व ओळखून सरकारने घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे. 

पॅनकार्ड बनवण्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी असेल याची प्रशिक्षण देण्यासाठीही देशभरात शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. 

इथं शिका घरबसल्या कसं मिळवाल पॅनकार्ड...

  • नवीन पॅनकार्ड बनवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://tin.tin.nsdl.com/pan/ 

  • नव्या पॅनकार्डसाठी अप्लाय करताना तुम्हाला फॉर्म ४९ - ए भरावा लागले. तुम्ही वरील वेबसाईटवर जाऊनही हा फॉर्म भरू शकता. 

  • इतर माहिती भरून फॉर्म सबमिट करा

  • फॉर्म ऑनलाइन जमा केल्यानंतर तुमच्यासमोर एक १५ अंकी एक्नॉलेजमेंट नंबर येईल. हा नंबर तुम्हाला सांभाळून ठेवावा लागले. 

  • एक्नॉलेजमेंट फॉर्म वर दिलेल्या जागी रंगीत फोटो चिटकवा... 

  • दिलेल्या जागांवर सही करा

  • हा एक्नॉलेजमेंट फॉर्म तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवावा लागेल. यासाठी, भारतात तुमच्या कोणत्याही पत्त्यावर आपलं पॅनकार्ड मागवण्यासाठी तुम्हाला ९६ रुपये शुल्क भरावं लागेल. हे तुम्ही इंटरनेट बँकींग, क्रेडीट, डेबिट कार्डाच्या साहाय्यानं ऑनलाईनही भरू शकता.

  • शुल्क भरल्यानंतर याची प्रिंट काढून एक्नॉलेजमेंट फॉर्म सोबत जोड आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवा. 

  • लिफाफ्यावर  'पॅन कार्डसाठी अर्ज - (१५ अंकी एक्नॉलेजमेंट नंबर) टाका आणि पाठवा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.