ऑफिसमध्ये महिलाच नाही पुरुषांसोबतही लैंगिक अत्याचार

महिलांवर कार्यालयात लैगिंक अत्याचार केले जातात, त्यामुळे महिलांसाठी कायदाही करण्यात आला. मात्र फक्त महिलांवरच लैगिंक अत्याचार नाही तर पुरूषांवरही लैगिंक अत्याचार होतात.

Updated: Aug 22, 2012, 10:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
महिलांवर कार्यालयात लैगिंक अत्याचार केले जातात, त्यामुळे महिलांसाठी कायदाही करण्यात आला. मात्र फक्त महिलांवरच लैगिंक अत्याचार नाही तर पुरूषांवरही लैगिंक अत्याचार होतात. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधातील विधेयक पुरुषांच्या अशा लैंगिक शोषणाविरोधात मात्र मौन पाळून आहे. याविरोधात टीका झाल्यावर
आता सरकारला जाग आली असून पुरुषांच्या लैंगिक छळाचा अभ्यास करण्यात येणार आहे.
कोणत्या प्रकारच्या लैंगिक शोषणाची शिकार पुरुषांना व्हावे लागते हे शोधण्यासाठी अभ्यास व्हावा अशी आपली इच्छा असल्याचे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री कृष्णा तिरथ यांनी सांगितले. आतापर्यंत महिलांच्या लैंगिक छळाबद्दलच बोलले गेले आहे हे त्यांनी मान्य केले.
नवा कायदा हा पुरुष-स्त्रियांबाबत सारखाच न्याय देणारा असावा अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आपण मंत्रालयाला असा अभ्यास करण्याची सूचना दिली आहे. असा अभ्यास करण्यात काहीच चूक नाही असे तिरथ म्हणाल्या.