चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एआयएडीएमकेनं रविवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आमदार हे शशिकला यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती करू शकतात, असं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
एआयएडीएमकेनं ही बैठक अचानक बोलवल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. जयललिता यांच्या निधनानंतर ओ.पनिरसेल्वम यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
पक्षप्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री एकच असावा असं वक्तव्य लोकसभेचे उपाध्यक्ष आणि एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते एम. थंबीदुराई यांनी केलं होतं. पक्षप्रमुखाकडून निवडणुकीवेळी आश्वासन दिलं जातं, त्यामुळे निवडणुकीनंतर या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आणि प्रशासनामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकच असावा असं थंबीदुराई म्हणाले होते.