'अफजल'च्या वादामध्ये शिवसेनेची उडी

अफजल गुरुला देण्यात आलेल्या फाशीचा निर्णय चुकला असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केलं होतं.

Updated: Feb 25, 2016, 02:44 PM IST
'अफजल'च्या वादामध्ये शिवसेनेची उडी title=

नवी दिल्ली: अफजल गुरुला देण्यात आलेल्या फाशीचा निर्णय चुकला असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केलं होतं. त्यामुळे आता चिदंबरम यांच्यावर टीका होऊ लागली आहे. 

चिदंबरम यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे कोर्टाचा अवमान आहे, त्यांच्याविरोधात याचिका दाखल करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

चिदंबरम कोण आहेत ? कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला ते आव्हान देत आहेत का ? त्यांच्याविरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा खटला दाखल करा असं राऊत म्हणाले आहेत.

 दरम्यान काँग्रेसनं मात्र चिदंबरम यांच्या वक्तव्यापासून लांबच राहायचा निर्णय घेतला आहे. चिदंबरम यांनी कोणत्या संदर्भामध्ये हे वक्तव्य केलं ते माहिती नाही, पण सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि तो योग्य आहे, असं काँग्रेसचे नेते अश्विनी कुमार म्हणाले आहेत.