सेना खासदारांनी जबरदस्तीनं ‘रोजा’ मोडल्याचा आरोप

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलंय. रमजान सुरू असताना केटरिंग सुपरवायजरला शिवसेना खासदारांनी चपाती खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आलाय. 

Updated: Jul 23, 2014, 12:56 PM IST
सेना खासदारांनी जबरदस्तीनं ‘रोजा’ मोडल्याचा आरोप title=
फाईल फोटो

मुंबई : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलंय. रमजान सुरू असताना केटरिंग सुपरवायजरला शिवसेना खासदारांनी चपाती खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आलाय. 

यामुळे, स्टाफमधील एका मुस्लिम व्यक्तीला रमजान महिन्यात पाळण्यात येणारा पवित्र ‘रोजा’ जबरदस्तीनं शिवसेना खासदारांनी मोडायला लावल्याचा आरोप केला जातोय. मुस्लिम स्टाफचा रोजा तोडल्याप्रकरणी शिवसेनेच्या 11 खासदारांवर आरोप लावला जातोय. 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेचे खासदार याप्रकरणात फसताना दिसतायत. मात्र, या प्रकरणाला विनाकारण धार्मिक रंग देण्यात येत असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय. 

दुसरीकडे, हे घटनेच्या आणि  धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध असून शिवसेनेच्या त्या खासदारांचं सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केलीय. तर राष्ट्रवादीनं याप्रकरावर टीका करत चौकशी करण्याची मागणी केलीय.

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, महाराष्ट्र सदनात महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण न वाढलं जाण्यावर नाराज झालेल्या शिवसेनेच्य 11 खासदारांनी केटरिंग सुपरवायजर अरशद सोबत दुर्व्यवहार केल्याचं समोर आलं होतं. 

या प्रकरणात महाराष्ट्र रेसीडेंट कमिशनरांकडे तक्रार केली गेलीय. कमिशनरांनी तक्रार मिळताच अरशद आणि आयआरसीटीसीनं माफी मागितलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.