धक्कादायक: बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडला हाडांचा ढीग

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथं असलेल्या एका बिस्कीट-बेकरी फॅक्ट्रीमध्ये हाडं सापडली. अन्न आणि पुरवठा विभागानं मारलेल्या छाप्यामध्ये हे हाडं बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडले. 

Updated: Dec 30, 2014, 08:16 AM IST
धक्कादायक: बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडला हाडांचा ढीग title=

मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथं असलेल्या एका बिस्कीट-बेकरी फॅक्ट्रीमध्ये हाडं सापडली. अन्न आणि पुरवठा विभागानं मारलेल्या छाप्यामध्ये हे हाडं बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडले. 

फॅक्ट्रीमध्ये जनावरांची हाडं आणि जनावरांचे अवयव सापडले. या हाडांचा वापर बिस्कीट बनविण्यात केला जात असल्याची माहिती, शहर न्यायदंडाधिकारी ए. के. श्रीवास्तव यांनी दिलीय. फॅक्ट्रीमध्ये काही बालकामगार काम करण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं. १४ वर्षांखालील वयाचे मुलं तिथं काम करतांना आढळली. 

पोलीस पुढे तपास करत आहेत. पण फॅक्ट्रीमध्ये तयार होत असलेले हे खाद्यपदार्थ कोणत्याही आरोग्यदायी मापदंडात बसत नसल्याचं स्पष्ट झालंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.