पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्यावर फेकला बूट

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्यावर बूट फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे. तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांना त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. प्रकाश सिंह बादल यांच्यावर त्यांच्या विधानसभा क्षेत्रात बूट फेकला गेला.

Updated: Jan 11, 2017, 03:52 PM IST
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्यावर फेकला बूट title=

चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्यावर बूट फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे. तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांना त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. प्रकाश सिंह बादल यांच्यावर त्यांच्या विधानसभा क्षेत्रात बूट फेकला गेला.

आगामी पंजाब विधानसभा निवडणूक २०१७ साठी मुख्‍यमंत्री प्रकाश सिंह बादल त्यांच्या विधानसभा क्षेत्रात सक्रिय झाले आहे. प्रकाश सिंह बादल यांच्यावर या व्यक्तीने बूट का फेकला याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.