नवी दिल्ली: नेमबाज तारा सहदेवच्या पतीला रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनला मंगळवारी रात्री झारखंड आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त टीमनं अटक केलीय. रंजीतला आज पोलीस रांचीला नेतील. प्रकरणाच्या सात दिवसांनंतर झालेल्या अटकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.
तर पीडित ताराचं म्हणणं आहे की, आता सर्व सत्य बाहेर येईल. मात्र तिनं आरोप लावलाय आता रणजीत पूर्ण तयारीनिशी समोर आलाय. ही अटक दिल्ली-गाझियाबाद बॉर्डरवर झालीय. पोलीस आता चौकशी करत आहेत.
तारा सहदेवचा फरार नवरा रणजीत उर्फ रकीबुलनं रांचीमध्ये पोलीस आणि प्रशासनाला पत्र लिहून आपण निर्दोष असल्याचे पुरावे सादर केले होते. रणजीतनं आपलं ड्रायव्हिंग लायसंस आणि इतर कागदपत्र दाखवून स्वत:ची ओळख सांगितलीय. तर त्याने तारा सहदेववर आरोप लावलाय की आपला भाऊ आणि वडिलांसाठी ती 15 लाखांची मागणी करत होती.
रणजीत सिंह कोहलीनं आपलं ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसंस दिलंय. यात त्याच्या वडिलांचं नाव हरनाम सिंह कोहली आणि जन्मतारीख 20 नोव्हेंबर 1977 दिलीय. हे ड्रायव्हिंग लायसंस याच वर्षी 8 मेला बनवलंय.
तारा सहदेवनं रणजीत कोहली सोबत लग्न केलं. लग्नानंतर तिला माहिती झालं तो मुस्लिम मुलगा आहे. त्याचं नाव रकीबुल हसन आहे. एवढंच नव्हे तर लग्नानंतर रकीबुल तारावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता. प्रकरण पुढं आल्यापासून तो फरार होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.