जम्मूमध्ये शिख समुदायाची बंदची हाक

जम्मूमध्ये शिख समुदायानं बंदची हाक दिली. काल पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक युवक ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. याच्याविरोधात हा बंद होता.

PTI | Updated: Jun 5, 2015, 05:14 PM IST
जम्मूमध्ये शिख समुदायाची बंदची हाक  title=

जम्मू : जम्मूमध्ये शिख समुदायानं बंदची हाक दिली. काल पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक युवक ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. याच्याविरोधात हा बंद होता.

खलिस्तानी अतिरेकी नेता जर्नेलसिंग भिनरनवाले याचं पोस्टर हटवल्यावरून पोलीस आणि शिख तरुणांमध्ये खटका उडाला. त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं होतं. या घटनेचा निषेध करण्यासाठी जम्मूतल्या शिख समुदायानं चक्काजाम आंदोलन केलंय. त्यामुळे जम्मू-पठाणकोट हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली.

या पार्श्वभूमीवर जम्मूसह परिसरातली सुरक्षा वाढवण्यात आली असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तर जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी शिख समुदायाला चर्चेला येण्याचं आवाहन केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.