'शिख दाम्पत्यांनी किमान तीन अपत्यांना जन्म द्यावा' - गुरबचन सिंह

शिख दाम्पत्यांनी किमान तीन मुलांना अपत्यांना जन्म द्यायला हवा, असे अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंह यांनी म्हटलंय. शिख धर्माच्या घटत्या लोखसंख्येला सावरण्यासाठी अधिक अपत्य जन्माला घालणे, हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Updated: May 13, 2015, 11:49 PM IST
'शिख दाम्पत्यांनी किमान तीन अपत्यांना जन्म द्यावा' - गुरबचन सिंह title=

मुंबई : शिख दाम्पत्यांनी किमान तीन मुलांना अपत्यांना जन्म द्यायला हवा, असे अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंह यांनी म्हटलंय. शिख धर्माच्या घटत्या लोखसंख्येला सावरण्यासाठी अधिक अपत्य जन्माला घालणे, हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

'शिखांच्या घरात दोन मतं आणि इतरांच्या घरात १० मते असतात. त्यामुळे कुणीही सांगू शकतो की अधिक मतं कुणाला पडतात. त्यामुळेच मी हे आवाहन केले आहे', असेही गुरबचन सिंह यांनी म्हटले आहे. पटियालात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
मुस्लीम कुटुंबात अधिक अपत्य असतात, त्यामुळेच त्यांचं राजकीय महत्त्व अधिक आहे. राजकारणात मुस्लीम व्होट बँकही मोठी आहे, असेही गुरबचन सिंह यांचे म्हणणे आहे.
 
अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंह यांनी त्यांचं हे मत वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. मात्र या आवाहानवर शिखांनी विचार करावा, असेही म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.