लवकरच 'सुटी' सिगारेट मिळणार नाही

सुट्या सिगारेटविक्रीवर लवकरच बंदी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तरूणांमध्ये सिगारेट फुंकण्याची सवय मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यावरून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Updated: Nov 26, 2014, 11:35 AM IST
लवकरच 'सुटी' सिगारेट मिळणार नाही title=

मुंबई : सुट्या सिगारेटविक्रीवर लवकरच बंदी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तरूणांमध्ये सिगारेट फुंकण्याची सवय मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यावरून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

तरूण मुले मोठ्या प्रमाणात वरच्या वर सुटी सिगारेट खरेदी करतात, यावरून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येतंय.

तसेच सिगारेट खरेदी करणारा आता १८ नव्हे तर २५ वर्ष वय पूर्ण केलेला असावा असा नवा नियमही लवकरच लागू होणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी राज्यसभेत लेखीस्वरूपात ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच यावर अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांकडून आता २०० नव्हे तर २ हजार रूपयांपर्यंत दंड वसुलीची तरतूद नियमात केली जाणार आहे.

तंबाखूमुक्तीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचा केंद्र सरकारकडे हा आग्रह आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.