दहशतवाद, नक्षलवादाच्या बुलेटला जनतेचं बॅलेटनं उत्तर

दहशतवाद आणि नक्षलवादाच्या दहशतीला दूर सारत लोकशाही मूल्यांवरची निष्ठा आज जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या जनतेनं दाखवून दिली. जम्मू काश्मीरमध्ये आज विक्रमी मतदान झालं. 

Updated: Nov 25, 2014, 10:59 PM IST
दहशतवाद, नक्षलवादाच्या बुलेटला जनतेचं बॅलेटनं उत्तर  title=

जम्मू-काश्मीर: दहशतवाद आणि नक्षलवादाच्या दहशतीला दूर सारत लोकशाही मूल्यांवरची निष्ठा आज जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या जनतेनं दाखवून दिली. जम्मू काश्मीरमध्ये आज विक्रमी मतदान झालं. 

पहिल्या टप्प्यात तब्बल 70 टक्के मतदान करण्याची विक्रमी कामगिरी आज जम्मू काश्मीरच्या जनतेने केली. तर नक्षलवादाची पर्वा न करता झारखंडच्या जनतेनं पहिल्या टप्प्यात तब्बल 62 टक्के मतदान करण्याची तुफानी कामगिरी केली. दहशतवाद, नक्षलवादाच्या बुलेटला सर्वसामान्य जनतेनं बॅलेटनं उत्तर दिलंय. 

काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना जनतेनं दिलेली ही मोठी चपराक आहे. निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज जम्मू-काश्मीरमधील 15 तर झारखंडमधील 13 मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं. पहिल्या काही तासातच जम्मूमध्ये मतदानासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. 

15 मतदारसंघांपैकी जम्मू विभागात 6, काश्मीर खोऱ्यातील 5 आणि लडाखमधील 4 मतदारसंघ आहेत. तर झारखंडमध्ये होणारे सर्व 13 मतदारसंघ हे नक्षलग्रस्त भागातील आहे. 23 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.