लखनऊ: गाडी घेऊन देण्यास नकार दिल्याने एका मेहुणीने आपल्या बहिणीच्या पतीचा न्यूड व्हिडिओ फेसबूकवर फेक आयडी बनवून शेअर केला. पतीचा असा व्हिडिओ पाहून नाराज झालेल्या पत्नीने त्याचे घर सोडून दिले.
बदनामी आणि पत्नी घर सोडून गेल्याने हताश झालेल्या पतीने फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुटुंबियांनी त्याला योग्यवेळी खाली उतरवून राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. आता पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे पाठविलेआहे.
लखनऊच्या गोमतीनगर येथील हितेश (नाव बदलले आहे) एका खासगी कंपनीत मॅनेजर हे. सहा महिन्यापूर्वी हितेशचे लग्न झाले. सासरी त्याची एक चुलत मेहुणी आहे. तिच्याशी त्याची पूर्वापासून ओळख आहे. दोघांनी बी-टेक एकत्र केले होते. दोस्ती असल्याने त्याचे तिच्या घरात येणे-जाणे होते. मुलीचे आजोबा परिवारासह तिथेच राहत होते. त्यांनी हितेशला पाहिले आणि कुटुंबियासोबत आपल्या दुसऱ्या मुलीचे लग्न ठरवले. या लग्नाला हितेश आणि त्याच्या मैत्रिणीचा विरोध होता. पण कुटुंबियासमोर काही चालले नाही. सहा महिन्यापूर्वी त्याचे लग्नही झाले. शिक्षण सुरू असताना हितेशचे काही प्रायव्हेट फोटो छोट्या मेहुणीने आपल्याकडे ठेवून घेतले.
या प्रायव्हेट फोटोंच्या आधारे ती त्याच्याकडून पैसे घेऊ लागली. हितेशने आपल्या मेहुणीची मागणी पूर्ण केली. दोन महिन्यापूर्वी तिच्या मागण्या वाढू लागल्या. तिने त्याच्याकडे कारची मागणी केली. जेव्हा त्याने कार देण्यास नकार दिला. त्यावेळी एक फेक आयडी तयार करून आपल्या भावोजीचा न्यूड व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला. हा व्हिडिओ हितेशच्या पत्नीला पाहिल्यावर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हितेशने मेहुणीला या बाबत विचारले तर तिने व्हिडिओ शेअर केल्याचा नकार दिला.
व्हिडिओमुळे कुटुंबीय आणि मित्रांमध्ये आपली अब्रू गेल्याने हताश होऊन हितेशने मंगळवारी आपल्या घरी फाशी घेण्याचा प्रयत्न केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.