मुंबई : सीमेवर तणावाचं वातावरण असल्यामुळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आगेत. दिवाळी, होळी काहीही असो सैनिकांना आपलं कर्तव्य बजावत असतांना कोणत्याही सणांचा कुटुंबियांसोबत आनंद घेता येत नाही. देशसेवा करणाऱ्या या सैनिकांच्या पत्नी देखील तितक्याच प्रेरणा देणाऱ्या आहेत. उत्तर भारतात करवाचौथ हा सण साजरा होतो. यामध्ये पत्नी आपल्या पतीसाठी उपवास करते आणि पतीचा चेहरा पाहिल्यानंतरच उपवास सोडते.
पण सैनिकांच्या पत्नी या चंद्राला बघूनच उपवास सोडतात. सीमेवर असलेल्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. अशाच एका सैनिकाच्या पत्नीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सैनिकाची पत्नी म्हणते की, 'मला गर्व आहे की तुम्ही सीमेवर राहून देशातील लाखो विवाहितांना सुरक्षित करवाचौथ साजरा करण्याची संधी देत आहात. सुट्टी नाही मिळत तर काही हरकत नाही. मी तुमचा फोटो पाहून उपवास सोडेल. फक्त एक विनंती आहे की, सीमेवर चंद्र दिसला तर तुमच्या सैनिकाच्या गणवेशातील एक फोटो मला व्हॉट्सअॅपवर पाठवा. मी त्याचीच आरती उतरवेल आणि माझी पूजा पूर्ण झाली असं मानेल.'