'दिवटा' हवा म्हणून त्यानं केली १४ मुलींची 'पैदास'!

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'सेल्फी विथ डॉटर' हे टिवटिव अभियान फारच गाजतंय. समाजात जनजागृती होऊन मुलींची संख्या वाढवण्यासाठी हातभार लागावा यासाठी हा पंतप्रधानांचा खटाटोप... पण, गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या अभियानाला त्यांच्याच राज्यातील एका बहाद्दरानं आपल्या पद्धतीनं हातभार लावलाय.

Updated: Jul 3, 2015, 05:08 PM IST
'दिवटा' हवा म्हणून त्यानं केली १४ मुलींची 'पैदास'! title=

दाहोद : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'सेल्फी विथ डॉटर' हे टिवटिव अभियान फारच गाजतंय. समाजात जनजागृती होऊन मुलींची संख्या वाढवण्यासाठी हातभार लागावा यासाठी हा पंतप्रधानांचा खटाटोप... पण, गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या अभियानाला त्यांच्याच राज्यातील एका बहाद्दरानं आपल्या पद्धतीनं हातभार लावलाय.

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील गरबाडा गावात राहणाऱ्या या बहाद्दराचं नाव आहे रामसिंह संगोड... मुलींची संख्या वाढवण्याची जबाबदारी आपल्या एकट्याच्याच खांद्यावर असल्याप्रमाणं रामसिंहनं तब्बल १४ मुलींची 'पैदास' केलीय.

रामसिंह आणि कनूबेन यांच्या लग्नाला आता २० वर्ष झालेत. वंशाच्या दिवट्याच्या हव्यासापोटी या दाम्पत्यानं १४ मुलींना जन्माला घातलंय. त्यातील दोन मुली दीड-दोन वर्षांच्या असतानाच आजारपणात मृत्यूमूखी पडल्यात. १४ मुलींच्या जन्मानंतर डिसेंबर २०१३ मध्ये या दाम्पत्याला एक मुलगा झालाय... आणि धक्कादायक म्हणजे, कनूबेन सध्या तिच्या तब्बल १६ व्या बाळंतपणासाठी तयार आहे.

१६ व्या वेळीही रामसिंहला मुलगाच होईल अशी आशा आहे. १४ बहिणींची जबाबदारी एकटा मुलगा कशी घेणार म्हणून त्याला मदत म्हणून दुसरा मुलगाच असलेला बरा, असं तो म्हणतोय. शिवाय, एकटा मुलगा असेल आणि त्याच्यासोबत एखादा अपघात झाला तर वंश पुढे कोण चालवणार? म्हणूनही त्याला दुसरा मुलगा हवाय.

रामसिंहच्या १४ मुलींपैकी मोठ्या दोघींची लग्न झालीत. आत्ताही कुटुंबात दहा मुली आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच... त्यामुळे, शाळा तर दूरच पण या मुलींना घरकाम आणि मजदूरीही करावी लागतेय. त्यामुळे, केवळ चार मुलींना शाळेत जाता येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.