कारमध्ये सपा नेत्याचा मुलीवर सलग १५ दिवस बलात्कार

उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका मुलीवर नोकरीचं आमिष दाखवून सतत १५ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. अपहरण करुन तिच्यावर सलग १५  दिवस सामूहिक बलात्कार केला. ज्या गाडीत हा बलात्कार झाला, त्या गाडीला काळ्या रंगाच्या काचा लावण्यात आल्या होत्या. 

Updated: Jun 11, 2015, 05:22 PM IST
कारमध्ये सपा नेत्याचा मुलीवर सलग १५ दिवस बलात्कार  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका मुलीवर नोकरीचं आमिष दाखवून सतत १५ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. अपहरण करुन तिच्यावर सलग १५  दिवस सामूहिक बलात्कार केला. ज्या गाडीत हा बलात्कार झाला, त्या गाडीला काळ्या रंगाच्या काचा लावण्यात आल्या होत्या. 
 
बंद गाडीत हात-पाय बांधून मुलीवर गँगरेप करण्यात आला. चौघा जणांनी क्रूरपणे बलात्कार केल्याचा पीडित मुलीचा आरोप आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पीडित मुलीला अन्न-पाणीही दिले गेले नाही, एवढंच नाही तर तिला मारहाणही करण्यात आली. 

आरोपींनी पीडित तरुणीला सीतापूरहून मथुरेला नेले आणि एका खोलीत बंद करुनही ठेवले होते. बीडीओ, ज्युनिअर इंजिनिअर, प्रधान आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांवरही पीडित तरुणींने गँगरेपचा आरोप केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.