www.24taas.com, मुजफ्फरनगर
यापुढे विद्यार्थ्यांना कॅमेरा असलेला फोन वापरता येणार नाही, असा नवा फतवा इस्लामी मदरसा दारुल उलूम देवबंदनं काढलाय. आत्तापर्यंत कॅमेऱ्यासहित मोबाईल वापरणाऱ्या १४ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेत.
मदरशाचे उपकुलपती मौलाना अब्दुल खलीक यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना याबाबत सतर्क करण्यात आलंय. भविष्यात विद्यार्थ्यांकडे कॅमेऱ्यासहित मोबाईल आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आलेत.
खलीक यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना फोन वापरायचा असेल तर वापरू शकतात, मात्र त्या मोबाईलमध्ये कॅमेरा नकोय. यामुळे मुलांवर वाईट प्रभाव पडणार नाही, असं मदरशाकडून सांगण्यात येतंय.