मुलांनी केला खुलासा, का करत होते स्मृती इराणींचा पाठलाग ?

एक एप्रिलला दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात चार मुलांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कारचा पाठलाग करत असतांना पकडण्यात आलं होतं. यानंतर स्मृती इराणी यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हवाले केले होते. चारही मुलांविरोधात तक्रार देखील दाखल केली होती.

Updated: Apr 2, 2017, 09:38 PM IST
मुलांनी केला खुलासा, का करत होते स्मृती इराणींचा पाठलाग ? title=

नवी दिल्ली : एक एप्रिलला दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात चार मुलांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कारचा पाठलाग करत असतांना पकडण्यात आलं होतं. यानंतर स्मृती इराणी यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हवाले केले होते. चारही मुलांविरोधात तक्रार देखील दाखल केली होती.

स्मृती इराणी यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या चारही मुलांना जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. शनिवार रात्री एकाने त्यांनी असं का केलं याबाबत पोलिसांना सांगितलं.

आम्ही मानतो की आम्ही नियमांचं उल्लंघन केलं आहे. गाडीत जोरात गाणे वाजत होते. आम्ही इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवत होतो. यामध्ये आम्हाला माहित नाही की आम्ही काय चुकी केली. आमच्या येथून गाडी निघाली तर आम्हाला नव्हतं माहित की त्यामध्ये कोण होतं. आम्ही नकळत त्या गाडीला ओव्हरटेक केलं. पण त्यामध्ये कोण बसलंय हे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही काही वेगळं कृत्य केलं की नाही हे आमच्या लक्षात नाही. 

मुलांनी स्मृती इराणी यांची माफी मागितली. मुलांनी त्या ठिकाणी देखील माफी मागितली. स्मृती इराणी यांच्याकडे त्यांचं भविष्य खराब होऊ नये म्हणून देखील विनंती केली.