नवी दिल्ली : मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीट घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रासह सात राज्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. याशिवाय खाजगी शैक्षणिक संस्था आणि पालकांच्या संघटनाही पुनर्विचारासाठी कोर्टात गेल्या आहेत.
महाराष्ट्रातर्फे अॅड. निशांत कातनेश्वर कोर्टात बाजू मांडणार आहेत. सुप्रीम कोर्टानं NEETच्या अंमलबजावणीसाठी आणखी दोन वर्षांची मुदत द्यावी आणि तोपर्यंत राज्यांच्या सीईटी सुरुच ठेवाव्यात अशी सर्व राज्यांची प्रमुख मागणी आहे.