www.24taas.com, नवी दिल्ली
सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे यांच्यावर लगेचच पत्रकारांनी अफझल गुरू आणि अजमल कसाब यांच्या फाशीबद्दल प्रश्नांचा भडिमार केला होता. त्यावेळी त्यांनी ‘गृहमंत्री म्हणून असे काम करून दाखवेन की, सारा देश माझी पाठ थोपटेल’ असे उत्तर दिले होते.
त्यानंतर शिंदे यांनी मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्या फाशीचे ‘ऑपरेशन एक्स’ अत्यंत गुप्तता राखत पुण्यात २१ नोव्हेंबरला फत्ते केले. कसाबच्या फाशीनंतर अफझल गुरूच्या फाशीबाबत शिंदे यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर त्यांना वारंवार छेडले जात आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला संपत आहे. गृहमंत्री शिंदे हे अफझल गुरूचा हिसाब चुकता कधी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.