अंतर्गत नाराजी भाजपसाठी त्रासदायक

गुजरातच्या सुरत शहरातली निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलीये. सर्वच्या सर्व म्हणजेच बाराही जागा जिंकण्याचं मोदींचं स्वप्न आहे. मात्र, भाजपमधली अंतर्गत नाराजी आणि सोबतच केशुभाई पटेलांची गुजरात परिवर्तन पार्टी भाजपसाठी त्रासदायक ठरणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2012, 12:51 PM IST

www.24taas.com, सुरत
गुजरातच्या सुरत शहरातली निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलीये. सर्वच्या सर्व म्हणजेच बाराही जागा जिंकण्याचं मोदींचं स्वप्न आहे. मात्र, भाजपमधली अंतर्गत नाराजी आणि सोबतच केशुभाई पटेलांची गुजरात परिवर्तन पार्टी भाजपसाठी त्रासदायक ठरणार आहे.
1986 पासून सूरत महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या भाजपचा हा बालेकिल्ला आहे. सुरतमध्ये धनाढ्य पटेल समाज आणि जैन समाजाची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरणारंय. जैन समाज बरेचदा भाजपला फलदायी ठरतो, असं चित्र आहे. मात्र, तरीही यावेळी जातीची समीकरणं तसंच मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांचा कौलही महत्वाचा ठरणारंय.