गांधीनगर : गुजरातमधील निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मंगळवारी गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सहकारी आणि सध्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पाळत ठेवण्याचा आरोप (स्नूपगेट) प्रदीप शर्मांवर होता. यानंतर प्रदीप शर्मा प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रदीप शर्मा यांना आज जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
कच्छचे जिल्हाधिकारी असताना कंपन्यांना अवैधरित्या जमीनींचे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याकडे एक कोटीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे सांगितले होते. शर्मा यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.