डिझेल 1 रुपयानं स्वस्त होणार, तर पेट्रोल दरात 1.75ची कपात

डिझेलचे दर 1 रुपया प्रति लीटरनं कमी होऊ शकतात आणि पाच वर्षांनी पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होणार आहेत. तर पेट्रोलचे दर सुद्धा 1.75 रुपये प्रति लीटरची कपात होऊ शकते. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होऊ शकतात. 

Updated: Sep 30, 2014, 04:42 PM IST
डिझेल 1 रुपयानं स्वस्त होणार, तर पेट्रोल दरात 1.75ची कपात title=

नवी दिल्ली: डिझेलचे दर 1 रुपया प्रति लीटरनं कमी होऊ शकतात आणि पाच वर्षांनी पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होणार आहेत. तर पेट्रोलचे दर सुद्धा 1.75 रुपये प्रति लीटरची कपात होऊ शकते. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होऊ शकतात. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्यानं देशांतर्गत इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज आहे. गेल्या महिन्यात डिझेलच्या विक्रीत सरकारी कंपन्यांना होणारा तोटा संपला. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून सध्याच्या डिझेलच्या दरांमुळं एक रुपयाचा फायदा सुरु झाला होता. त्यामुळंच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचवला जाण्याची शक्यता आहे.

 29 जानेवारी 2009 रोजी डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच डिझेलच्या दरात ही कपात अपेक्षित आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकांनंतर डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.