नवी दिल्ली : ललित मोदीला व्हिजा मिळवून देण्यासंबंधी वादात अडकलेल्या परदेश मंत्री सुषमा स्वराज यांना आणखीन एक धक्का बसलाय.
सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी आपण २२ वर्ष ललित मोदींसाठी वकील म्हणून काम केल्याचं मान्य केलंय.
एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१० च्या आयपीएल सीझन दरम्यान ललित मोदींकडून मुंबईतील एका हॉटेल आपली राहण्याची सोय करण्यात आली होती, असं कौशल यांनी मान्य केलंय.
मी ललित मोदी यांचा वकील होतो आणि त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी मी तिथे गेलो होतो, असंही कौशल यांनी सांगितलंय. कौशल यांचं हॉटेल बिल ललित मोदी यांच्या कार्यालयाला धाडण्याऐवजी आयपीएल खात्यातून भरण्यात आलं होतं. मी केवळ ललित मोदींना कायदेशीर सल्ला दिला होता... पण, मी नेहमीच क्रिकेटपासून दूर राहिलोय.
महत्त्वाचं म्हणजे, आलेल्या पाहुण्यांची यादी समोर आल्यानंतर बीसीसीआयमध्ये भूकंप आला होता. आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपांखाली आयपीएस सीझन संपल्यानंतर मोदींना कमिशनर पदापासून हटवण्यात आलं होतं. यापूर्वी सुषमा स्वराज यांची मुलगीही ललित मोदी यांच्या लीगल टीममध्ये सहभागी असल्याचं समोर आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.