नवी दिल्ली : भारताच्या सलग सहाव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे. २०.१९ टक्क्यांमध्ये घट होऊन २२.३४ टक्के अरब डॉलर इतकी निर्यात झाली. गेतवर्षी मे महिन्यात ही निर्यात २७.९९ टक्के अब्यज डॉलर्स होती.
निर्यात कमी होण्यास क्रूड तेलाच्या किंमती, जागतिक मंदी आणि वधारलेला रुपया कारणीभूत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये निर्यातीत ७.२७ टक्के सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली होती. मुख्य निर्यात क्षेत्र असलेले पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने, अभियांत्रिकी आणि रसायने यांच्यात एप्रिलमध्ये नकारात्मक वाढ झाली.
मार्चमध्ये भारताच्या निर्यातीत २१ टक्के झाली होती. गेल्या सहा वर्षांतील निर्यातीत झालेली सर्वात मोठी घट आहे. भारत २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ठेवलेले ३४० अब्ज डॉलरचे वार्षिक निर्यातीचे लक्ष्य साध्य करू शकला नाही. गेल्या वर्षी भारताची निर्यात ३१०.५ अब्ज डॉलर होती.
तसेच मे महिन्यात आयातीमध्येही घट झाली आहे. आयातीत १६.५२ टक्के घट झाली असून आयात ३२.७५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात व्यापारी तूट कमी झालेय. व्यापारी तूट १०.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गतवर्षी मे महिन्यात व्यापारी तूट ११.२३ अब्ज डॉलर होती.
कच्च्या तेलाच्या आयात मूल्यात ४०.९७ टक्के घट झाली आहे. मे महिन्यात ८.५३ अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात करण्यात आले होते. बिगर-तेल आयात देखील २.२४ टक्क्यांनी कमी झाली असून २४.२१ अब्ज डॉलर झाली आहे. तर सोन्याची आयात मे महिन्यात १०.४७ टक्क्यांनी वाढली असून २.४२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
एप्रिल-मे २०१५ या कालावधीत निर्यात १७.२१ टक्क्यांनी कमी झाली असून ४४.४ अब्ज डॉलरवर पोचली आहे. आयात देखील १२.२ टक्क्यांनी कमी झाली आहे. आयात ६५.८ अब्ज डॉलर झाली आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत २१.३९ अब्ज डॉलरची व्यापार तूट झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.