नवी दिल्ली : जगातली सर्वात क्रुर दहशतवादी संघटना आयसीस ताजमहलला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार आयसीसने एक ग्राफिक्स जारी केलं आहे ज्यामध्ये भारतात हल्ल्यासह ताजमहलला टार्गेट केलं जाणार आहे.
दहशतवादी संघटनांना ऑनलाइन मॉनिटर करणारी अमेरिकेच्या साईट इंटेलिजेंस ग्रुपने त्यांच्या वेबसाईटवर हा फोटो बुधवारी अपलोड केला होता. ही माहिती मिळाल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.