"जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा भारतात परतेल"

 'मुस्लिम कट्टरपंथीयांची भीती आहे. बांगलादेशच्या लेखकांना त्यांनी मारले आहे. भारत सरकारची भेट घेऊ इच्छित आहे. परंतु, अद्याप वेळ मिळालेली नाही. 

Updated: Jun 3, 2015, 11:36 PM IST
"जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा भारतात परतेल" title=

न्यूयॉर्क :  'मुस्लिम कट्टरपंथीयांची भीती आहे. बांगलादेशच्या लेखकांना त्यांनी मारले आहे. भारत सरकारची भेट घेऊ इच्छित आहे. परंतु, अद्याप वेळ मिळालेली नाही. 

जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा भारतात परतेल.' असं बांगलादेशच्या वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. तस्लिमा यांचे वास्तव्य सध्या अमेरिकेत आहेत. 

बांगलादेशमध्ये फेब्रुवारीपासून तीन ब्लॉगरची हत्या झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन सुरक्षिततेविषयी चर्चा करणार आहे. 

दरम्यान, तस्लिमा यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी आली आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेत वास्तव्य केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.