मुंबई : पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विविध स्तरांतून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. बांग्लादेशी गायिका तस्लिमा नसरीन यांनी यावर टीका करत 'भारत हिंदू सौदी बनतोय' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
शिवसेनेच्या धमकीनंतर गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावर, गुलाम अली यांनीदेखील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलीय.
अधिक वाचा - मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी
याच विरोधात तस्लिमा नसरीन यांनीही ट्विट केलंय. 'ओह माय गॉड... शिवसेनेच्या धमकीनंतर पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. भारत हिंदू सौदी अरब बनतोय?' असं ट्विट त्यांनी केलंय.
'मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यातील पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाही. अशा स्थितीत पाकच्या कोणत्याही कलाकाराला इथं कार्यक्रम करू देणार नाही... सरकारमध्ये असलो तरी आम्ही आमचा विरोध दाखवून देऊ' अशी भूमिका सेनेनं घेतली होती. गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करून आम्ही शहीद जवानांना श्रद्धांजली दिलीय, अशी प्रतिक्रिया सेनेच्या संजय राऊत यांनी दिलीय.
अधिक वाचा - शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द
यापूर्वीही, एप्रिल महिन्यातही पुण्यातील हडपसरमध्ये पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम यांचा एक कार्यक्रम विरोधाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.