नवी दिल्ली : मोबाईल युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील 'रोमिंग'चे दर कमी करण्याचं ट्रायने ठरवलं आहे.
आता 'रोमिंग'मध्ये असताना 'इनकमिंग कॉल'साठी प्रतिमिनिट जास्तीत जास्त ४५ पैसे इतकाच दर आकारता येणार आहे.
यापूर्वी राष्ट्रीय रोमिंगचे दर २०१३ मध्ये बदलले होते. रोमिंगचे नवे दर १ मे २०१५ पासून लागू होतील.
प्रकार |सध्याचे दर |नवे दर
स्थानिक कॉल |1 रुपया प्रति मिनिट | 80 पैसे प्रति मिनिट
(ज्या शहरात असाल तेथील)
एसटीडी कॉल |1.50 रुपया प्रति मिनिट |1.15 रुपया प्रति मिनिट
इनकमिंग कॉल |75 पैसे प्रतिमिनिट |45 पैसे प्रतिमिनिट
स्थानिक एसएमएस |1 रुपया प्रति मेसेज |25 पैसे प्रति मेसेज
एसटीडी एसएमएस |1.50 रुपया प्रति मेसेज |38 पैसे प्रति मेसेज
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.