नवी दिल्ली : गुप्तचर विभागाने एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाचं अपहरण होण्याचा इशारा दिला आहे. गुप्तचर विभागाने हायअलर्ट जारी केला आहे, यानंतर दिल्लीसह देशातील सर्व विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
विमानतळनजीकच्या परिसरातही कमांडो गस्त घालणार आहेत तसंच परिसरातील वाहनांवरही करडी नजर ठेवण्यात येणार आहे. सर्व विमानतळांवर प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा तपासणीमुळे आता विमानतळावर प्रवाशांचा काही वेळ जास्त खर्च होऊ शकतो.
दहशतवादी १९९९ मध्ये कंदहार अपहरणासारखा कट रचत आहे. १९९९ साली दहशतवाद्यांनी IC 814 फ्लाईटचं अपहरण करुन कंदहारला घेऊन गेले गोते. त्यावेळी प्रवाशांच्या सुखरुप सुटकेच्या मोबदल्यात भारताला तुरुंगात असलेल्या अनेक दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.