जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार

बिहारमधील गयामध्ये एका जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला मागील २० दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आलं होतं, या प्रकरणी पोलिसांनी २ युवकांना अटक केली आहे.

Updated: Jan 3, 2015, 08:19 PM IST
जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार title=

गया : बिहारमधील गयामध्ये एका जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला मागील २० दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आलं होतं, या प्रकरणी पोलिसांनी २ युवकांना अटक केली आहे.

पीडित पर्यटक महिलेला बौद्ध सर्किटमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काही व्यक्तींनी आश्‍वासन देत तिला बोध गयामध्ये नेले. त्यानंतर त्यांनी तिला एका गावामध्ये ओलीस ठेवले. 

तेथे काही युवकांनी तिच्यावर तब्बल २० दिवस सामूहिक बलात्कार केला. नंतर त्यांनी तिच्याकडे असलेल्या वस्तू लुटल्या, असे पीडित तरुणीने कोलकाता येथील पार्क स्ट्रिट पोलिस स्थानकात २६ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटन मार्गदर्शक जावेद खान आणि साजीद खान यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीअंती पोलिसांनी प्रथम मोहम्मद याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून तारो गावात छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.