नवी दिल्ली : सध्या येमेन देशात अशांतता निर्माण झाली आहे. देशात हिंसाचार सुरुच आहेत. यामध्ये एक आठ महिन्यांचा बालक फसला गेला. त्याच्या आईने आपली धास्ती ट्विटवर व्यक्त केली. हा ट्विट थेट विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत माय-लेकांना सुखरुप भारतात आणले.
युद्धग्रस्त येमेनमधून सबा शावेश नावाची महिला आपल्या आठ वर्षांच्या मुलासह सुखरुपपणे सोमवारी भारतात परतली. मात्र, त्यांची परतण्याची वाट सोपी नव्हती. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी शेवटी ट्विट केले. ते त्यांच्या फायदाचे ठरले.
सबा शावेश हिने येमेनमधूनच ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेश मंत्री सुषणा स्वराज यांना विनंती केली. स्वराज यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. सबा येमेन नागरिक असून तिचं लग्न भारतीय व्यक्तीशी झालं होतं. त्यांना आठ महिन्यांचा एक मुलगा आहे.
३१ मार्चला सबाने ट्विट केलं होत की, माझा मुलगा भारतीय आहे. त्याला येमेनमधून बाहेर पडण्यास मदत करावी. त्यानंतर पुन्हा ४एप्रिलला ट्विट केलं, माझा मुलगा माझ्या जीवनातील प्रेमाचे प्रतिक आहे. आम्हाला भारतात सुरक्षित पोहोचविण्यासाठी प्रार्थना करावी. त्याचवेळी तिने आपल्या मुलाचा फोटोदेखील ट्विटवर शेअर केला होता.
रविवारी सुषमा स्वराज यांनी ट्विट करताना मदत पोहोचवली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे त्यांना सोमवारी भारतात आणण्यात आले. यानंतर सबा यांनी ट्विटवरुन सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. आतापर्यंत २३०० नागरिकांना देशात आणण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.