कबड्डीपटूची भरदिवसा हत्या सीसीटीव्हीत कैद

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका कबड्डीपटूची गोळी मारून हत्या करण्यात आली. 

Updated: Mar 16, 2016, 02:33 PM IST
कबड्डीपटूची भरदिवसा हत्या सीसीटीव्हीत कैद  title=

रोहतक : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका कबड्डीपटूची गोळी मारून हत्या करण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 

हत्याचा हा खळबळजनक प्रकार रोहतकच्या रिठाल गावात झाला. गावात हरियाणाचा प्रसिद्ध कबड्डीपू सुखविंदर आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मंगळवारी रात्री स्कूटीवर दोन तरूण आले आणि काही समजण्याच्या आत त्यांननी सुखविंदरच्या छातीवर गावठी कट्ट्याने गोळी मारली. 

सुरूवातीला त्याच्या छातीवर गोळी मारली आणि त्यानंतर त्यांनी डोक्यात गोळी मारून फरार झाले. सुखविंदर याचा जागेवरच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर घटनास्थळी लोक धावत आले. 

धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज