close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लालूंचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक आणि...

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट आणि ई-मेल हॅक करण्यात आले. 

Updated: Mar 16, 2016, 12:48 PM IST
लालूंचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक आणि...

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट आणि ई-मेल हॅक करण्यात आले. 

हॅकर्सनं लालूंच्या अकाऊंटवरून अनेक राष्ट्रीय नेत्यांबद्दल आपत्तीकारक आणि अश्लील पोस्ट टाकल्यात. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लालूंनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं. 

लालुंचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी याबद्दल पोलिसांत एफआयआर नोंदवलीय. पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

लालूंचं अकाऊंट कुणी हॅक केलं आणि का? याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, अनेक राजकीय नेते सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचं वारंवार दिसून येतंय.