'व्हॉटस् अॅप'नं केली चोरी उघड...

पाटण्यात एका चोरी अनोख्या पद्धतीनं उघडकीस आलीय... आणि हाच चर्चेचा विषय ठरलाय. कारण ही चोरी उघडकीस आलीय व्हॉटस अॅपच्या माध्यमातून... 

Updated: Nov 4, 2014, 09:28 PM IST
'व्हॉटस् अॅप'नं केली चोरी उघड... title=

पाटणा : पाटण्यात एका चोरी अनोख्या पद्धतीनं उघडकीस आलीय... आणि हाच चर्चेचा विषय ठरलाय. कारण ही चोरी उघडकीस आलीय व्हॉटस अॅपच्या माध्यमातून... 

जवळपास एक महिन्यापूर्वी पाटण्याच्या फुलवारी शरीफ स्थित हारुन कॉलनीमधल्या एका घरात घुसला... त्यानं इतक्या सफाईदारपणे ही चोरी केली की पोलीस कदाचित या चोराला हेरूच शकले नसते. झालंही असंच... पण...

चोरानं चोरी केली आणि तिथून धूम ठोकली खरी पण, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. ज्यांच्या घरात ही चोरी झाली त्या इजाज यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही लावला होता. गुन्ह्याची नोंद केल्यानंतर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाटण्यातील इतर पोलीस स्टेशनमध्येही या घटनेबद्दल माहिती दिली गेली. शोध सुरूच होता... 

याचदरम्यान, इजाजनं आपल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून आपल्या मित्रांसोबत शेअर केलं... आणि याचमुळे पोलीस या चोरापर्यंत पोहचू शकले, असं पाटण्याचे एसएसपी जीतेंद्र राणा यांनी दिलीय. 

या घटनेनंतर पोलीस आपल्या घरात आणि सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची सूचना लोकांना देत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, व्हॉटस् अॅपचं महत्त्व ओळखून पोलीस आपला नंबरही व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून लोकांमध्ये पोहचवत आहेत. 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.