शहीद मनदीप सिंह यांना अखेरचा निरोप

माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात शहीद झालेल्या शिपाई मनदीप सिंह यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Updated: Oct 30, 2016, 11:37 AM IST
शहीद मनदीप सिंह यांना अखेरचा निरोप title=

कुरुक्षेत्र : माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात शहीद झालेल्या शिपाई मनदीप सिंह यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनदीप सिंह मूळचे हरियाणातल्या कुरुक्षेत्रचे होते. मनदीप सिंहांना अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खं गाव लोटलं होतं. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही हजर होते. त्यांनी मनदीप सिंहांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.

देशासाठी लढता लढता धारातीर्थी पडल्यावर मनदीप सिंह यांच्या मृतदेहाचीही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अवहेलनाही केली होती. त्याचा बदला भारतीय सैन्यांनी दिला. पण मनदीप यांच्या रुपानं आपला आणखी एक जवान मातृभूमीसाठी कामी आला. त्यामुळे साऱ्या कुरुक्षेत्रावर आज दुःखाचं सावट आहे.