www.24taas.com, मुर्शिदाबाद
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका पंचायत कर्मचा-याचा कान कापल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममतांचं लोकशाही सरकार आहे की जंगलराज असा प्रश्न उपस्थित होतोय.
सूत्रांच्या माहितीनुसार हा कर्मचारी देशव्यापी संपामुळे कामावर आला नव्हता. यामुळे नाराज झालेल्या तृणमूल कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. ११ कामगार युनिअन्सचा आज ‘भारत बंद’ आहे. तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते आज या पंचायत कर्मचाऱ्याच्या घरी आले होते. यावेळी त्याच्याशी कार्यकर्त्यांचं भांडण झालं. या वेळी रागाच्या भरात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने या पंचायत कर्मचाऱ्याचा कान कापला. जखमी कर्मचाऱ्याला इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेची सीपीएम, सीपीआय आणि भाजपने कठोर शब्दांत निंदा केली आहे. सीपीआयच्या गुरूदास गुप्तांनी या घटनेची टीका केली आहे. भाजपनेही या घटनेबद्दल टीका केली आहे.