भुवनेश्वर : रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला.
दान माझी असं या व्यक्तीचं नाव आहे. दान यांची पत्नी अमंग यांना टीबी झाला होता. माझी यांनी रुग्णालयाकडे अॅम्ब्यूलन्सची विनंती केली, पण रुग्णालयानं ही विनंती मान्य न केल्यामुळे दान माझींनी त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीबरोबर मृतदेह घेऊन जायला सुरुवात केली.
मी रस्त्यावरून जात असताना अनेकांकडे मदतीची मागणी केली, पण कोणीही माझी मदत केली नाही, असं दान माझी म्हणाले आहेत. दान माझींनी 10 किमीचा प्रवास केल्यानंतर स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं हा प्रकार पाहिला आणि त्यानं प्रशासनाला माहिती दिली.
मुख्य म्हणजे ज्या ओडिसामध्ये ही घटना घडली आहे, तिकडे सरकारी रुग्णायलातून मृतदेह घरी नेण्यासाठी कोणतंही शुल्क घेतलं जात नाही. असं असतानाही या व्यक्तीला 10 किमीपर्यंत मृतदेह घेऊन जावा लागाला.
ही दृष्यं तुम्हाला विचलीत करू शकतात