मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटेचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. मैसूरमधल्या प्रिटिंग प्रेसमध्ये या नोटांच्या प्रिंटिंगला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे, पण आरबीआय किंवा भारत सरकारनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आरबीआय दोन हजार रुपयांच्या नोटा बनवून त्या चलनात आणण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी व्हायरल होणाऱ्या या नोटा खऱ्या आहेत का नाही याबाबत मात्र अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. आरबीआयनं दिलेल्या सल्ल्यानंतर नवीन नोटा चलनात आणायच्या का नाही याबाबत सरकार निर्णय घेत असतं.
व्हायरल होणाऱ्या या नोटा गुलाबी रंगाच्या आहेत. तर आत्तापर्यंत प्रत्येक नोटेवर असणारा महात्मा गांधींचा फोटो या नोटेवर दिसत नाही.