पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, एक जवान शहीद

पाकिस्तनाकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. बीएसएफकडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यात येत आहे. पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागात पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. पुंछमधील केजीमध्ये पाकिस्तानकडून 2 वेळा घुसखोरीचे दोन प्रयत्न झाले. यावेळी झालेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला. 

Updated: Nov 6, 2016, 03:53 PM IST
पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, एक जवान शहीद title=

श्रीनगर : पाकिस्तनाकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. बीएसएफकडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यात येत आहे. पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागात पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. पुंछमधील केजीमध्ये पाकिस्तानकडून 2 वेळा घुसखोरीचे दोन प्रयत्न झाले. यावेळी झालेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला. 

पाकिस्तानने सामान्य नागरिकांना आणि सैन्याला लक्ष करत गोळीबार केला. अजूनही गोळीबार सुरु असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत. तर 2 जवान देखील जखमी झाले आहेत.