राम मंदिराबाबत दोन दिवशीय शिबीर, काँग्रेसचा विरोध

दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राम मंदिराबाबतच्या दोन दिवसीय शिबिराला सुरुवात झालीय. मात्र शिबिराचं उदघाटन होण्याआधीच युथ काँग्रेस आणि डाव्याच्या विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.

Updated: Jan 10, 2016, 12:23 PM IST
राम मंदिराबाबत दोन दिवशीय शिबीर, काँग्रेसचा विरोध title=

नवी दिल्ली : दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राम मंदिराबाबतच्या दोन दिवसीय शिबिराला सुरुवात झालीय. मात्र शिबिराचं उदघाटन होण्याआधीच युथ काँग्रेस आणि डाव्याच्या विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.

शिक्षणाचं भगवाकरण होत असल्याचा आरोप या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झालीय... वाढता विरोधाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आयटीबीपीच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. 

'श्री राम जन्मभूमी मंदिर: उभरता परिदृश्य' असा या शिबिरातील चर्चेचा विषय आहे. भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी या शिबीराचं उदघाटन केलंय.. अरुंधती वरिष्ठ अनुसंधान पीठानं या शिबीराचं आयोजन केले आहे. या शिबिरावरुन आता जोरदार राजकारणही सुरु झाले आहे.

असहिष्णुतेच्या मुद्यावरुन टीका करणारे आता कुठे गेले असा सवाल भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला आहे. तसंच राम मंदिर होणारच, असा विश्वासही त्यांनी या शिबिरात बोलताना व्यक्त केला आहे.