जलिकट्टू स्पर्धेदरम्यान दोघांचा मृत्यू

तामिळनाडूच्या एम पुडूर भागात आयोजित केलेल्या जलिकट्टू स्पर्धेदरम्यान दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय.

Updated: Apr 17, 2017, 06:06 PM IST
जलिकट्टू स्पर्धेदरम्यान दोघांचा मृत्यू  title=

चेन्नई : तामिळनाडूच्या एम पुडूर भागात आयोजित केलेल्या जलिकट्टू स्पर्धेदरम्यान दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. तर 80 जण जखमी झालेत. 32 वर्षीय थिरूनावकराऊ या इंजिनिअर विद्यार्थ्याचा बैलाने मारलेल्या धडकेत जागीत मृत्यू झाला.

तर बैलाचा आवेश पाहून दूस-या व्यक्तीला हृद्य विकाराचा झटका आला आणि जागीच मृत्यू झाला. बैलाच्या धडकेत 80 जण जखमी झालेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही जणांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलंय.