सरकारी नोकरीत यापुढे बढतीसाठीही आरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळं यापुढे एससी एसटींना नोकरीच्या बढतीमध्येही आरक्षण मिळणार आहे. बसपाच्या नेत्या मायावती यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.
यासंदर्भातील विधेयक चालू अधिवेशनातच मांडण्यात येणार आहे. यासाठी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याेत येणार आहे. येत्या दोन दिवसांमध्येाच हे विधेयक सादर होण्याची शक्यकता आहे.
मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या् विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे.