सीबीआयचं धाडसत्र; दर्डा `कंपनी`ही जाळ्यात?

कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं देशभरात ठिकठिकाणी छापे टाकलेत. छापा टाकलेल्या कंपन्यांमध्य यामध्ये दर्डा कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या जेएलडी यवतमाळ लिमिटेड या कंपनीचाही समावेश आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 4, 2012, 11:39 AM IST

www.24taas.com, मुंबई
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं देशभरात ठिकठिकाणी छापे टाकलेत. छापा टाकलेल्या कंपन्यांमध्य यामध्ये दर्डा कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या जेएलडी यवतमाळ लिमिटेड या कंपनीचाही समावेश आहे.
सीबीआयनं कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी धाडसत्र सुरू केलंय. आत्तापर्यंत देशभरातील ३० शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोळसा कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं हे छापे टाकलेत. आठ राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. नागपुरातील तीन कंपन्यांच्या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. सोलर एक्सप्लोजीन लिमीटेड आणि एएमआर आयर्न स्टील कंपनी लिमिटेड या कंपन्यांसोबत दर्डा कुटुंबीयांच्या जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमीटेड कंपनीचाही समावेश आहे. भाजपच्या किरीट सोमय्या यांनी नुकताच कोळसा प्रकरणी दर्डा कुटुंबियांवर आरोप केला होता, त्यामुळे या छाप्यांना महत्त्व प्राप्त झालंय.
सीबीआयनं धाड टाकलेल्यांपैकी ५ कंपन्यांवर फसवणुकीच्या गुन्ह्याखाली एफआयआरदेखील दाखल केलंय. तसंच काही अधिकाऱ्यांवरही याचा ठपका ठेवण्यात आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयनं आत्तापर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, हैद्राबाद, धनबाद और नागपूर मध्ये जवळजवळ ३० ठिकाणी छापे टाकलेत.